10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन:
आयुष्याशी प्रेम करा म्हणजे आत्महत्येचे विचार मनात येणार नाहीत
दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या विषयी बोलायचे झाल्यास कितीतरी व्यक्ती मानसिक खच्चीकरनामुळे, नैराश्यामुळे किंवा उद्भवलेल्या विविध समस्यांमुळे आत्महत्या केल्याची नोंद आहे. आत्महत्या रोखणे फार महत्वाचे आहे. लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीला रोखता येईल असा संदेश हा दिवस देतो.
आत्महत्येविरोधात आयुष्यभर संवाद होणे फार महत्वाचे आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे विचार रोखण्यासाठी बरीच तयारी करण्याची गरज आहे. जर एखाद्याला आत्महत्या करणारे विचार येत असतील तर आपण आपला मुद्दा आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर सामायिक केला पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञांशी बोलले पाहिजे. कुटुंब आणि मित्र यांच्याकडे मन मोकळे केले पाहिजे. हे समजले पाहिजे की तो त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो आणि त्याला चांगल्या प्रकारे समजतो.
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात आत्महत्या रोखता येऊ शकतात. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्यांमुळे लोक आत्महत्या करतात. जीवनाकडे संतुलित दृष्टीकोन ठेवा. चांगले आणि वाईट दोन्ही आयुष्याचे पैलू आहेत. आपल्या चुका जाणून घ्या आणि केलेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा.
नकारात्मक विचार करू नका, सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तीशी सल्लामसलत करा आणि त्यांना मानसिक त्रासातून मुक्त करण्याचा प्रयत्न करा.
धन्यवाद🙏😊


No comments:
Post a Comment