Saturday, 30 May 2020

31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन

              31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन





Watching video👇




             
                       31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने ३१ मे १९८७ साली करण्यात आली. ‘तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे रोग’ या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख...
                 तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
तंबाखू वनस्पती :-

तंबाखूला निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांपासून बनविण्यात येते. तंबाखूचे पीक जगभरात उपलब्ध असून त्याला उत्तम मागणी आहे.  निकोटीन हा तंबाखूमधील एक प्रमुख घटक असतो.

तंबाखूचा  इतिहास :-

अमेरिकेमध्ये इसवीसनपूर्व ६००० मध्ये तंबाखूची शेती केल्याचे सर्वात जुने पुरावे सापडतात. तेथील आदिवासींनी धार्मिक आणि औषधी कारणासाठी तंबाखूचा वापर केला होता.भारतात तंबाखूचे पीक इसवीसन १६००च्या सुमारास पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आणले. भारतात त्या आधीही तंबाखूच्या काही स्थानिक जाती होत्या. परकीय व्यापाऱ्यांसाठी भारत हे तंबाखूचे एक प्रमुख उत्पादन केंद्र बनले. ब्रिटीश राजवटीत तंबाखू हे एक प्रमुख नगदी पीक होते.

तंबाखूचे प्राचीन पुरावे :-

भारतातील प्राचीन साहित्यांमध्ये तंबाखूचे ‘तमाखू’ असे वर्णन करण्यात आले आहे. संस्कृत आणि इतर काही प्रादेशिक भाषेतील साहित्यांमध्ये तंबाखूचे सतराव्या शतकापूर्वीचेही दाखले मिळतात. काही इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकाच्या सुरवातीस तंबाखूची वनस्पती अमेरिकेतुन भारतात स्थलांतरीत झाली. भारतामध्ये गांज्याचा वापर इसवीसनपूर्व २००० पासून असून, सर्वप्रथम त्याचा उल्लेख अथर्ववेदामध्ये करण्यात आला आहे, प्राचीन काळी तंबाखूचा उपयोग आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्हीसाठी केला गेला. तसेच, पाहुण्यांचे स्वागत करतानाही तंबाखू भेट म्हणून दिली जात असे.

तंबाखूचे उत्पादन करणारे देश :-

            तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होते. यानंतर ब्राझील आणि भारताचा क्रमांक येतो. भारतात आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिमबंगाल या राज्यांमध्ये तंबाखूचे पीक घेतले जाते. तमिळनाडु, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, म्हैसूर आणि पश्चिम बंगालमध्ये तंबाखू संशोधन केंद्रे आहेत.

तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम :-

                 तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम :-

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

मोहीम :-
               एकीकडे भारतासह जगभरातील देशांमध्ये त्याविरूद्ध मोहीम सुरू आहेत, तर दुसरीकडे कंपन्या तरूण आणि महिलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तंबाखू कंपन्या सिगारेटपेक्षा कमी हानिकारक म्हणून च्युइंग, स्निफिंग आणि हुकसाठी वापरली जाणारी उत्पादने विकत आहेत.
तंबाखूवर कर लावून ते तंबाखूविरोधी मोहिमेवर जगातील देशांपेक्षा पाच पटीने अधिक कमावतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कोट्यवधी लोकांची उदरनिर्वाह त्यातजोडलेलीआहे.

झाफराणी जरदा आणि पॅन मसाला असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक चैतन्य अग्रवाल म्हणतात, "सरकार त्यावर भारी कर लादते, परंतु हे कोट्यवधी लोकांच्या उदरनिर्वाहाचे काम करणे देखील महत्त्वाचे आहे."

दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, बिडी लावण्यास बंदी आहे, पण यासाठी कोणालाही शिक्षा झालेली नाही.

अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ ब्लूमबर्ग आणि बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या मदतीने घेतलेल्या अभ्यासानुसार अशी शिफारस केली गेली आहे की भारतात तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एक्साईज टॅक्स वाढवून तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमती वाढविणे.
२०१० पर्यंत दरवर्षी तंबाखूमुळे होणा deaths्या मृत्यूची संख्या १० लाखांपर्यंत असू शकते असे संस्थेचे म्हणणे आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बहुतेक मेलेले लोक गरीब व अशिक्षित असतील.

गुटखा :
              गुटखा म्हणजे तंबाखू, चुना,सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला, इ. चे मिश्रण असते. अनेक नावांनी गुटखा विकला जातो. पान मसाला, गुटखा, सुपारी, आदी पदार्थ चघळणाच्या सवयीमुळे हा आजार दिसून येतो. या आजारात तोंडातल्या मऊ त्वचेखालील भाग निबर होत जातो. यामुळे तोंडाची हालचाल आखडत जाते. तोंडात पांढरट चट्टे दिसू लागतात. हा चट्टा बोटाने चाचपता येतो. जीभेवरही पांढरट डाग येतात. जीभ 'संगमरवरी' पांढरट गुळगुळीत दिसते.हा आजार हळूहळू काही महिन्यांत वाढतो. दिवसेंदिवस तोंड उघडायला कठीण होऊ लागते. आजार जास्त वाढेपर्यंत त्या व्यक्तीला पुरेसे कळून येत नाही. आणखी एक लक्षण म्हणजे मसाला, तिखट तोंडाला अजिबात लागू देत नाही, खूप झोंबते. या आजारातून पुढे कॅन्सर उद्भवू शकतो.गुटखा विकण्याला महाराष्ट्रात बंदी आहे. काही राजकीय पक्षांनी याबद्दल मोहीम सुरु केली होती. तरीही बेकायदेशीर रित्या गुटखा निरनिराळया नावाने विकला जात आहे. लोकशिक्षण हा यासाठी जास्त चांगला व टिकाऊ उपाय आहे. संपूर्ण भारतातही आता गुटख्याला बंदी लागू झाली आहे. उपचार गुटखा रोगावरचा उपायही बरेच दिवस करावा लागतो. (अ) बीटा- कॅरोटीनची रोज एक गोळी याप्रमाणे सहा महिने द्यावी. (ब) काही दंतवैद्य मानवी वारेचे सत्त्व इंजेक्‍शनच्या स्वरूपात डागाखाली टोचतात. (क) या उपायांबरोबरच आखडलेले तोंड सैल करावे लागते. यासाठी एक गुळगुळीत लाकडी पाचरीसारखी फळी दिवसातून 3-4 वेळा तोंडात 15-20 मिनिटे ठेवावी. रोज थोडी थोडी जास्त पाचर घालावी. यामुळे हळूहळू तोंड सैल होते.

तंबाखू सेवन कसे सोडू शकता? :-

                 डॉक्टरांच्या सल्ल्‌यानुसार हे व्यसन सोडता येऊ शकते. धूम्रपान करणा-या लोकांपासून दूर राहा. दारूचे व्यसन टाळा. त्यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा होते. धूम्रपानाची सवय बदला आणि त्या जागी इतर गोष्टींची सवय करून घ्या. शारीरिक व्यायाम, योगा यांसारख्या उपक्रमांत स्वत:ला गुंतवा.

आपली जबाबदारी :-

               व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा



स्रोत - इंटरनेट
         संदर्भ साहित्य

Wednesday, 27 May 2020

रमाबाई भिमराव आंबेडकर स्मृतिदिन 27 मे

                           
           रमाबाई भिमराव आंबेडकर
    (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी)




       जन्म : ७ फेब्रुवारी १८९८
                (वंणदगाव)
  निर्वाण:२७ मे, १९३५ (वय ३७)
          (राजगृह, दादर, मुंबई)

टोपणनाव: रमाई (माता रमाबाई),

रमा, रामू (बाबासाहेब रमाबाईला प्रेमाने 'रामू' म्हणत)
 
वडील : भिकू धुत्रे (वलंगकर)
आई : रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)
पती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये : यशवंत आंबेडकर                      रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.           
                  
💁🏻‍♀️ सुरूवातीचे जीवन

                       रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.

🤝 विवाह

                          डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.

🔵 कष्टमय जीवन

इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.

त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.

ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.

🔵 बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी

रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.

🌀 रमाबाई ते रमाआई

एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.

ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.

वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देवून म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.

ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" म्हणतात,

"भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |"

🕯️ निर्वाण

रमाईची शरिर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्‍न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्‍न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.

📘 थॉट्स अॉन पाकीस्तान

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.

📚 रमाईंवरील पुस्तके

रमाई – यशवंत मनोहर
त्यागवंती रमामाऊली – नाना ढाकुलकर, विजय प्रकाशन (नागपूर), ४०३ पृष्ठे
प्रिय रामू - योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे- २३०
📯 *लोकप्रिय संस्कृतीत*
रमाबाई आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक गोष्टींना त्यांचे नाव दिले गेले आहे.

🏢 शैक्षणिक संस्था

मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, औरंगाबाद
रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली
माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर (स्थापना १९९०)

🎞️📽️ चित्रपट
रमाई : हा इ.स. २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित मराठी चित्रपट असून त्यात रमाबाईंच्या मुख्य भूमिकेत वीणा जामकर आहेत.
रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
रमाबाई (चित्रपट)

📺 *मालिका संपादन*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा – रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेत शिवानी रांगोळे

         💠 जयभीम 💠                                               
       

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

     
        स्त्रोत ~ WikipediA
➖➖➖➖➖➖➖➖➖                                         

Friday, 22 May 2020

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन- २२ मे

           आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन- २२ मे




               जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालू आहे... कीटकांच्या नव्या प्रजाती अद्यापही सापडत आहेत ! जगातील माहित असलेल्या सजीवांपैकी ७८ टक्के प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा ‘बायोडायव्हर्सिटी डे’ जगभर साजरा केला जातो.

🔵 मूळ संकल्पना व सुरुवात


*जैवविविधता*
म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते.

पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. तिच्याबाबत योग्य माहितीचा प्रसार झ्ल्यास तिचे संरक्षण करण्याबाबतही जागृती करता येईल; अशा विचाराने हा दिवस, सन २००० च्या आधीपासूनच साजरा केला जातो. २०१५ ते २०३० ह्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना’ ठरवली आहे.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनालाच  'जागतिक जैवविविधता संवर्धन दिन' असेही म्हणतात. याची सुरूवात संयुक्त राष्ट्रांनी केली होती.
आपल्या जीवनात जैवविविधता खूप महत्वाची आहे. आम्हाला जैवविविधतेने समृद्ध, शाश्वत आणि आपल्याला आर्थिक क्रियाकलापांच्या संधी देण्याचे वातावरण तयार करावे लागेल. जैवविविधतेच्या अभावामुळे पूर, दुष्काळ, चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा धोका अधिकच वाढतो, म्हणूनच जैवविविधतेचे संरक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे कारण कोट्यावधी विशिष्ट जैविक जीव आहेत आणि आपले जीवन निसर्गाची एक अनोखी भेट आहे. म्हणूनच झाडे, झाडे, अनेक प्रकारचे प्राणी, माती, हवा, पाणी, समुद्र, पठार, समुद्री नद्या या सर्वांनी आपण या सर्व निसर्गाच्या देणगीचे रक्षण केले पाहिजे कारण हे आपल्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी उपयुक्त आहे.
नैसर्गिक आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन जैवविविधता दिन आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
             
        हा निर्णय नैरोबी येथे 29 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या जैवविविधता परिषदेत घेण्यात आला होता, परंतु अनेक देशांच्या व्यावहारिक अडचणींमुळे 29 मेऐवजी 22 मे हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जैवविविधतेचे महत्त्व आणि विशेषत: जंगल, संस्कृती, जीवनाचे कलाकुसर, संगीत, कपडे, खाद्यपदार्थ, औषधी वनस्पतींचे महत्त्व इत्यादींचे प्रतिबिंब दाखवून जैवविविधतेचे महत्त्व आणि त्याच्या अनुपलब्धतेच्या धोक्यांविषयी जागरूक केले पाहिजे.

🔘  जैवविधतेत आपण कुठे:-

जगात पहिल्या १० महत्त्वाच्या देशांत भारताचा क्रमांक लागतो. जगाच्या एकूण जैवविविधतेच्या तब्बल ८ टक्के जैवविविधता भारतात आढळते. आज भारतात एकूण वनस्पती ५०००, सस्तन प्राणी ३९७, पक्षी १२८४, सरपटणारे प्राणी ४७८, उभयचर प्राणी ३१२, मत्स्यवर्गीय प्राणी २६४१, कीटक ५८००० पैकी फुलपाखरे १५०२ व १७१८ कोळ्यांच्या प्रजाती आढळून येतात. महाराष्ट्रात एकूण १२७ सस्तन प्राणी, ६३० पक्षी, ५४० फुलपाखरे, ७०० च्या वर कोळ्यांच्या प्रजाती, ४७ प्रकारचे चतुर, १०० च्या वर सरिसृप आढळून येतात. एकूण १६५ मासे व ५० च्या वर उभयचर प्रजाती आहेत. म्हणजेच महाराष्ट्रही यात कुठेच मागे नाही; मात्र अलीकडच्या काळात जैवविविधता संवर्धन व कायद्याच्या दृष्टीने बदल घडून आले आहेत. जनसामान्यांसाठी हा विषय अजूनही नवखाच आहे.


🔵 जैवविविधतेत होत असलेले बदल

झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फ़ोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा ता नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बाग्डवीत पण आताच्या सध्याच्या स्तिथीत पाहिलं तर सगळीकड कोन्क्रीतीकरण वाढलेलं आहे त्यामुळ आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेग्वेगली शो ची झाड लावली जातात अस जर होत राहील तर त्या फुलपाखरांनी बागडायचं कुठ त्यांनी मध कुठ तयार करायचा?

🔵 जैवविविधता विकास (उत्क्रांति)

आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते. चोपन्न कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कँब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कँब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कँब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४०कोटी वर्षामध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली. (या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या दोन तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षापूर्वी आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायाचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस” ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते


🔵जैविक विविधतेचे संवर्धन ही जागतिक चिंता

जैविक विविधतेचे संवर्धन ही जागतिक चिंता बनली आहे. जरी प्रत्येकाची मर्यादा नाही आणि वर्तमान विलुप्त होण्याच्या महत्त्ववर सहमत आहे, परंतु बहुतेक जैवविविधता आवश्यक मानली जाते. मूलभूतपणे संवर्धनाचे दोन मुख्य प्रकार आहेत, अंतर्गत-संवर्धन आणि भूतकाळातील संरक्षणाचे. अंतस्थ स्थितीला सामान्यत: एक आदर्श संरक्षण धोरण म्हणून पाहिले जाते. तथापि, कधीकधी त्याची अंमलबजावणी अपरिहार्य असते. उदाहरणार्थ, दुर्मिळ किंवा संकटात सापडलेल्या प्रजातींच्या निवासस्थानाचा विनाश करण्यासाठी कधीकधी भूतपूर्व संवर्धन प्रयत्नांची आवश्यकता असते.याव्यतिरिक्त, पूर्वीच्या परिस्थितीत संरक्षण प्रकल्प बॅकअप सोल्यूशन प्रदान करू शकतात - सीटू संवर्धन प्रकल्पांमध्ये. काहींचे मत आहे की योग्य संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही प्रकारचे संरक्षण आवश्यक आहे. परिस्थिती संरक्षण क्षेत्रातील उदाहरणांपैकी एक स्थान संरक्षण क्षेत्रातील आहे. पूर्वीच्या संरक्षणाच्या प्रयत्नांची उदाहरणे सीडबँकमध्ये जर्प्लास्ट रोपणे किंवा व्हॉल्मी पाइन नर्सरींमध्ये वाढत आहेत अशा प्रयत्नांमुळे कमीतकमी अनुवांशिक र्‍हास असणा plants्या मोठ्या संख्येने वनस्पतींचे संवर्धन होऊ शकते. .

राष्ट्रीय स्तरावर, एक जैवविविधता कृती योजना कधीकधी स्वतंत्र प्रजातीच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या प्रोटोकॉलची पूर्तता करण्यास तयार असते. या प्रजातीचा सद्यस्थितीचा व त्यातील वास्तव्याचा सद्यस्थितीतही सद्य आकडेवारीचा तपशील असतो अमेरिकेत अशा योजनेस पुनर्प्राप्ती योजना असेही म्हणतात.

जैविक विविधतेला धोका हा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक परिषदेच्या निरंतर विकासासाठी चर्चेचा विषय होता.

  { आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनावर एक सुंदर लेख }

                               👇

         कुतूहल : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन

आज करोना प्रादुर्भावामुळे केलेल्या टाळेबंदीमुळे आपण सर्व आपापल्या घरात आहोत. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणाऱ्यांची ‘हे घरचि माझे विश्व’ अशी परिस्थिती झाली आहे. अशा स्थितीत थोडा वेगळा विचार करून पाहू. जैवविविधता अनुभवण्यासाठी आपण अनेक वन्यजीव अभयारण्ये, पाणथळ भूमी, गवताळ प्रदेश, नद्यांना भेटी देतो. परंतु आपल्या आजूबाजूला, अगदी आपल्या घरातदेखील जैवविविधता आहे, हे सहसा आपल्या लक्षात येत नाही.
सर्वसाधारणपणे आपल्या घरात जिवाणू, बुरशी यांसारख्या अतिसूक्ष्म जीवांपासून ते माश्या, मुंग्या, झुरळ, डास, वाळवी यांसारखे कीटक आणि पाली, कोळी, उंदीर असे अनेक जीव येऊन-जाऊन असतात किंवा कायमचा मुक्कामही ठोकतात. ‘नेचर’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, सर्वसामान्यपणे तब्बल १०० विविध प्रजातींचे संधिपाद (ज्यांच्या पायांना सांधे आहेत असे अपृष्ठवंशी) प्राणी घरात राहतात. यातील बहुतांश प्राणी हे निरुपद्रवी असतात. घरामध्ये आपण स्वच्छतेसाठी अनेक रासायनिक द्रवरूपी फवारे मारतो. यामुळे मानवी आरोग्याला उपायकारक असणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंच्या काही प्रजाती नष्ट होतात. यामुळे काही वेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात. परंतु घरातील काही प्राणी अशा सूक्ष्म जिवाणूंचा घरात फैलाव करून त्या जिवाणूंची विविधता पुन्हा प्रस्थापित करण्यास हातभार लावतात, असेदेखील या संशोधनात आढळून आले आहे!
अशा या घरातील तसेच घराबाहेरील वैशिष्टय़पूर्ण जैवविविधतेचे व्यापक भान निर्माण करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन’ संयुक्त राष्ट्रांकडून २२ मे रोजी साजरा होतो आहे. ‘आपल्या पर्यावरणीय समस्यांचे उत्तर निसर्गातच आहे’ हे यंदा हा दिवस साजऱ्या करण्यामागील संकल्पना-सूत्र आहे. २०२० हे वर्ष अनेकांगांनी महत्त्वाचे आहे. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या ‘जैवविविधता दशका’ची यंदा सांगता होत आहे. तसेच सद्य करोना प्रादुर्भावाने पर्यावरण- जैवविविधता यांच्याविषयी नव्याने विचार करायला भाग पाडले आहे. मानवाने कितीही भौतिक प्रगती साधली, तरी त्याचे अवलंबित्व अखेर निसर्ग आणि जैवविविधतेवरच आहे, हेही यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आजच्या आंतरराष्ट्रीय जैविक विविधतादिनी जैवविविधतेच्या संवर्धनाचा निश्चय करायला हवा. सुरुवात घरातील जैवविविधतेपासून करू.. ती अनुभवू!

                                   – सुरभी वालावलकर   
                                 मराठी विज्ञान  परिषद

🐴🐎🦄🐦🐤🦇🐿️🐊🐢🦎🐍🐲🐉🌳🌴🌵🌾🌿🌷🍀

✏️संकलन :- नितीन रोडगे
    ✏️स्रोत- इंटरनेट व संदर्भ साहित्य

 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

Thursday, 14 May 2020

15 मे जागतिक कुटुंब दिन

                       
                            15 मे  जागतिक कुटुंब दिन



                               
         🍃जागतीक कुटुंबदिनाच्या हार्दिक शुभेच्या




                   ☝️ वर क्लिक करा आणि विडिओ पहा


                   १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही हे आहे. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे.

⭐ सद्यस्थितीत असंख्य कुटुंबाची अवस्था अशी आहे जिथे ते कुटुंब महिनो-महिने एकत्र भेटत नाही. फोन अथवा सोशल मिडियाद्वारे ते एकत्र असतात.

🔰 एकीकडे याआधी एकत्र कुटुंब राहायचं तस कुटुंब क्वचितच आढळत.त्यातच आजकाल लग्न झालेल्या मुलांचे आई-वडील वृद्धाश्रमात आढळला.ही परंपरा आपली नसूनसुद्धा आपण त्याच्या जवळ गेलोय.

🔰देशात हम दो, हमारे दो ही संकल्पनाही मागे पडत असून हम दो, हमारा एक ही संकल्पना जोर धरु लागली आहे.

🔰काही घरांत आजी-आजोबा एकीकडे आणि मुले पाळणाघरात आणि आई-वडील दिवसाचा किमान १० तास नोकरीला असेच चित्र सध्या पहायला मिळते.

🔰सोशल मीडियाही विभक्त कुटुंबाला कारणीभूत आहे. दिवसभरात रात्रीच्यावेळी एकत्र येणारी मंडळी एकमेकांत संवाद न साधता सोशल मीडिया आणि टीव्ही-मालिकांमध्ये व्यस्त होऊन जाते. त्यामुळे त्यांचात संवाद सुद्धा होत नाही.

🔰आजकाल तर काय कुटुंबाचे व्हाट्सअपवर ग्रुप पाहायला मिळतात. मात्र या ग्रुपमुळे घरी भेट देणारे कुटुंब आता व्हाट्सअपवर संवाद साधू लागले. अशाप्रकारे कुटुंबव्यवस्था धुळीस मिळाली आहे.

🔰घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण देशात वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची
कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे.

🔰संपूर्ण स्थितीकडे पाहता कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी 15 मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिनी’ एकत्र येऊन विभक्त कुटुंब पद्धतीचा नायनाट केला पाहिजे.

                कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. ज्या कुटुंबात प्रेम नसेल, ते कुटुंब, कुटुंब नसून स्मशान आहे. असे समजावे. आपल्याला माहित आहे. स्मशानात अनेक प्रेत असतात, परंतु एकमेकांना कधी भेटत नसतात किंवा बोलत नसतात. ज्या कुटुंबात सासू-सून, पती-पत्नी आणि पिता-पुत्र एकत्र राहत असूनही एकमेकांना बघून आनंदीत होत नसतील, तर ते कुटुंब स्मशान नाही काय? आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे.

                'हेल्पेज इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 52 टक्के वृद्ध अशिक्षित आहेत. 50 टक्के वृद्ध आर्थिक दृष्ट्या आपल्या मुलांवर व सुनांवर अवलंबून आहेत. 85 टक्के वृद्ध वैद्यकीय उपचारावरील खर्चासाठी इतरांवर अवलंबून आहेत. 98 टक्के वृद्ध हे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलत नाहीत. याबाबत तक्रार करणे मग लांबच राहते. अपमान सहन करणे हा या वृद्धांच्या दिन चर्येचाच भाग बनला आहे. 15 मे जागतिक कुटुंब दिन म्हणून आपण संपूर्ण जगात साजरा करतो. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खर तर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही. 15 मे जागतिक कुटुंब दिनी भारतातील सर्व कुटुंबीय आनंदाने आणि सुख समृद्धीने नांदावे तसेच एकत्र कुटुंबपद्ध सर्वत्र रूजावी व एकत्र कुटुंबपद्धतीत वाढ व्हावी, एवढीच या 'जागतिक कुटुंब दिनी' अपेक्षा!


📍जिव्हाळा हा घराचा कळस आहे
📍माणुसकी ही घरातील तिजोरी आहे
📍गोड शब्द हे घरातील धन दौलत आहे
📍शांतता ही घरातील लक्ष्मी आहे
📍पैसा हा घराचा पाहूणा आहे
📍व्यवस्था ही घराची शोभा आहे
📍समाधान हेच घराचे सुख आहे…! 🌹

   🍃 जागतीक कुटुंबदिनाच्या हार्दिक शुभेच्या


                       

Monday, 11 May 2020

जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेचा निकाल ऑनलाईन

         जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेचा निकाल ऑनलाईन



                 https://youtu.be/gAusBTSSzgs

                        (बातमीचा विडिओ)
       🖕वरील लिंक वर citi cable chandrapur नि केली बातमी प्रसारित




                      🖕वर click करा आणि video पहा

दैनिक देशोन्नती दि.12.05.2020

              संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत.या काळात शासन निर्णयानुसार राज्याने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला असून विद्यार्थ्यांना Study From Home या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अभ्यास देत गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जात आहे.त्यातच निकालही ऑनलाईन देण्याबाबतच्या निर्णयानंतर किटाळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने आपल्या वर्गाचा निकाल चक्क ऑनलाईन जाहीर केला.
ऑनलाईन निकाल जाहीर करणाऱ्या या तंत्रस्नेही शिक्षकाचे नाव श्री.नितीन एफ.रोडगे असून ते जि.प.उच्च प्राथ.शाळा,किटाळी पं.स.चंद्रपूर येथे विज्ञान विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे.नुकताच त्यांनी आपल्या वर्गाचा निकाल जाहीर केला असून त्यांच्या या प्रणालीमुळे पालक आपल्या पाल्याच्या निकालासोबतच त्याच वर्गातील इतरही विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पाहू शकतात.चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या जिल्हा  परिषद शाळेचा निकाल अशाप्रकारे जाहीर  होत असल्याने या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमशील शिक्षकाने अनेक उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थी विकासासाठी प्रयत्न केले आहे. ते ई- माझीशाळा नावाने ब्लॉग  तसेच e-mazishala नावाने App चालवीत असून शिक्षकांना उपयोगी व विद्यार्थी विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असतात.

...
मा.प्रविणभाऊ मेकर्तीवार(पत्रकार) यांचे विशेष आभार
ज्यांच्यामूळे बातमी प्रसारित झाली.भाऊ आपले मनस्वी धन्यवाद
मोबा. 95951 77977


मान्यवरांच्या प्रतिक्रिया व शुभेच्छा :


✏️sanjay Gharde⁩ (professor,gov.polytechniq Washim)

1) *जिल्हा परिषद शाळांचे निकाल ऑनलाइन घोषित करणारे आयु. नितीन रोडगे हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथम शिक्षक आहेत.*

असे या news चॅनेल वरील बातमीने खूप अभिमान वाटला. अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत राहा आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान स्नेही बनवून त्यांचेही आयुष्य उज्ज्वल करीत राहा...

*आपल्या गावातील सुपुत्राची अशाप्रकारे positive news एखाद्या टीव्ही चॅनेलने एवढ्या सविस्तरपणे बातमी दाखवणे व दखल घेणे, हे पहिल्यांदाच बघत आहे. सदर बातमीत चक्क तीन वेळा _'नितीन रोडगे'_ हे नाव घेऊन त्यांनी चालविलेल्या उपक्रमांबद्दल छान विश्लेषण करण्यात आले.*

*त्यामुळे अजूनही मान गर्वाने उंचावली.*

*नितीन, खूप खूप अभिनंदन.*
🎍🎍🎉🎉🎊🎁🎁🎊🎁


2) Excellent job performed by you. Inspiration and motivation for all. This is a innovative kind of initiative in ZP schools by prominent teachers like you. Government should give appreciation and should recognise your work. I hope so.. all the best for future endeavour.

✏️ संजय शहारे:   Great job

✏️वंदेश फुलझेले सर (शि. वि.अ. बिट- पद्मापुर)
👌👌👌

✏️Ravi Tamgadge:
Congratulations bhau👌🏻👌🏻👌🏻very good

✏️Praful Chawre⁩ :💐💐💐💐💐💐💐🙏🙏

⁨✏️MOTILAL RODGE⁩  👍👍👌👌

✏️⁨Pramesh RODGE⁩ : 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

✏️Chetan bagde⁩ :
नितीन भाऊ  खूप छान उपक्रम राबवून एक प्रामाणिक  आणी आदर्श शिक्षक आहे हे तुम्ही समाजाला दाखवून दिले अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

✏️Pravin Walke : Great bhau

✏️Praful Gondane⁩ : 👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷


⁨✏️Dhammadip Gondane⁩: खूप खूप अभिनंदन नितीन दादा
👍👌👌👌

✏️Prithviraj Dongare⁩ : अप्रतिम कार्य नितिन
👍👍👍


✏️Pratima Z. Sarade⁩
खूप खूप अभिनंदन नितीन 💐💐💐💐🌹🌹🌹🌹

✏️जुही घरडे⁩ : 👏🏻👏🏻👏🏻

✏️⁨pragati⁩ chavre 👍👏👏

⁨✏️Kumud Badge⁩: 👌👌👏👏

✏️Dr. Vinayak Rodge⁩: 👏💐

✏️Sanam Gedam⁩ : अभिनंदन गुरुजी

⁨✏️Kallyani  Dongre⁩: Abhinandan sir💐

⁨✏️ASMINA Sanjay Gharde: अभिनंदन नितिन😷💐                                                     🙏🏻

✏️Arati V Khobragade⁩: 👍👍

✏️Priti Hirekhan⁩: खुप खुप अभिनंदन नितीन सर💐💐                                        🎍🌹

✏️Rajendra Koli⁩ : अभिनंदन नितीन...💐💐💐

✏️Vikas Ganvir⁩ : नितीन खूप छान मित्रा...
                         कौतुकास्पद बाब आहे ही..
                         अभिनंदन..

                        कदाचित महाराष्ट्रात हे प्रथमच असेल..
💐💐💐💐💐💐💐💐


✏️Sudhir Khobragade⁩

*नितीन, खूप खूप अभिनंदन.*
🎍🎍🎉🎉🎊🎁🎁🎊🎁


✏️⁨Siddrth Dongre⁩ : 💐💐💐💐

✏️Rajkumar welhekar: 👌👌👌💐💐

✏️तांबोळी निखिल :
Nice work Nitin.👌👌

✏️Padole sir: Best work 👌👌💐💐

✏️Dinesh Tirpude: 👍🤘🤟🏽

✏️Indrajit Raypure
               Nice work Rodge sir🌹🌹🙏🙏

✏️Pritesh Meshram
                Congratsss Nitin khup chan💐💐💐

✏️Kuldip bagde
                      Kakaji abhinandan 💐💐💐


⁨✏️Pornima Shende Tagade⁩ : 👍👍💐

⁨✏️Bhogekar sir⁩ : 👍

⁨✏️Wakkar R.K.⁩ : 👌👌👌👍🌹

 ✏️संतोष शुक्ला सर⁩: Well done sir 🌷🌷🌷👍👌👌                           👌👌👌

✏️Aruna Shende⁩ : 👍👍👍🙏


✏️मेहनाझ मॅडम⁩: 👌👌👌☝👍🏻💐💐💐
                       Mst


✏️नांदे सर उर्जानागर⁩ : Good 🌷🙏

✏️वैरागडे सर⁩ : Well done Sir👍💐💐👌

✏️ येशूदास ढोरे
                  Good work sirji

✏️Vivek vallapkar
                                 👌👌🌹

✏️डॉ.प्रा.सुशांत चिमनकर:
                                 1) रोडगे सर .....
अप्रतिम आणि स्तुत्य उपक्रम राबविला आहे....
आपली नक्कीच शासन दरबारी दखल घेतली जाईल ....

आपल्या सारखे काम प्रत्येक शिक्षकाने केले तर नक्कीच शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल.

आम्हाला अभिमान आणि गौरव वाटतो की आपण स्वतःचे नाव तर लौकिक करत आहातच त्यासोबत गावचे नाव सुद्धा रोशन करत आहात....

एक मानाचा तुरा गावाच्या शिरपेचात पुन्हा रोवला गेला...

अभिनंदन सर 🌻🌻🌻🌻

2)रोडगे सर अभिनंदन
अप्रतिम आणि व्याख्यानाजोगे काम केलात आपण
👏👏👏


✏️डॉ.वैशाली वडेट्टीवार
                               अभिनंदन sir 👌👌👌👏👏👍

✏️अर्जुन चव्हाण
                        Good job sirji 👌👍💐

✏️स्मिता काटकर
congratulation nitin sir💐💐
well done 👍👍

✏️जयश्री निखाडे
       Congratulations💐💐👌

✏️सुभाष बांते
       अभिनंदन नितीन🌹🌹

✏️हरीश ससनकर(राज्यसरचिटणीस, म रा पु प्रा शि समिती)
       nice

✏️Lokesh khandare (शि वि अ चंद्रपूर)
      good nitin  sir

✏️वैशाली गजभिये
      Great job👍👍

✏️सुबोध हजारे
        Very good

✏️चंदू रोकडे
         Good job sirji

✏️PRANIT GORAKH
                 Congratulations sirji💐

✏️ Dhyandevi wankhede: 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐

✏️Prashant Bambole
                       👍👍👍 great sirji
                            Keep it up

✏️ Vijay Dahake
Wow...great...अभिनंदन 💐👍🙏

✏️ Ajay Vidhate
👆👍👍👍जबरदस्त भाऊ,,,,जिवती सोडल्या बरोबर प्रगतीची गती वाढली भाऊ


✏️Atul Mahajan
       👍👍💐💐सुपर डूपर work  नितीन भाऊ


✏️Dushant Nimkar : 👌

✏️ नितीन शास्त्रकार
अभिनंदन भाऊ 👌👌👏💐💐🙏

✏️निलेश खरे
Mitra congratulations

✏️बंडू गेडाम
आयु रोडगे सर अभिनंदन💐💐💐💐💐

✏️ बालाजी नंदगावे
अभिनंदन
अभिमानास्पद मित्रा💐💐💐💐💐💐

✏️लखन साखरे
*Badhiya नितीन भाऊ*👌👌👌💐💐💐💐💐

✏️ ढोके सर   अभिनंदन रोडगे सर👌👌👌 

✏️ चंदू मानकर
👌🏻super

✏️Dr. Amit shinde
Congratulations Nitin keep going👍👍👍👍

✏️Sunil madarkar
: Congratulations Nitin Nitin 💐💐

✏️Rahul Harshe
Congratulations🎉🎊 mithun

✏️नितीन सोनकुसरे
Shabbash re patthhyaa 👍👍👍


✏️वीरेंद्र गेडाम।      👌good work





















   सर्व स्नेही, मित्रांचे खूप खूप मनस्वी आभार आणि धन्यवाद🙏😊

Wednesday, 6 May 2020

वैशाख बौद्ध पौर्णिमा विशेष

                          
                                बौद्ध पोर्णिमा                


 (वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप मंगलकामना)                           
                    बुद्धाब्ध 2564


                  https://youtu.be/Km84S9q0H3U

                  【🖕वरील लिंक ला touch करा आणि ऐका माझ्या आवाजात】



                 
जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱया तथागत गौतम बुद्धांची ‘वैशाख बुद्ध पौर्णिमा’ जगभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने  मी  सर्व बांधवांना  बुद्धपौर्णिमेच्या  खूप खूप मंगल कामना देत आहे .याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या; त्या म्हणजे १. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म, २. राजकन्या यशोधरेचा जन्म, ३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह), ४. ज्ञानप्राप्ती, ५. महापरिनिर्वाण

वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत ‘वेसाक्को’ म्हणतात. वर उल्लेखिलेल्या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या पौर्णिमेला अलौकिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. नेपाळच्या पायथ्याशी वसलेल्या लुम्बिनीच्या वनात ख्रिस्तापूर्व ५६३ साली कपिलवस्तूची महाराणी महामाया देवीने बाळाला जन्म दिला. बाळाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होते.

बुद्ध यांनी तपश्चर्या केल्याने पिंपळवृक्ष बोधीवृक्ष म्हणून नावारुपास आला. बोधीवृक्षाला जागतिक वारसा सूचीत सामावून घेतले आहे.

तथागत बुद्धांनी दिलेला ‘चरथ भिक्खये चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा संदेश शेकडो वर्षे लोकांना प्रकाशवाट दाखवत आहे, याचेच प्रचीती यानिमित्ताने येत आहे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर बौद्ध हा जगातील तिसरा मोठा धर्म आहे. चीन, जपान, कोरीया, थायलंड, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका, भुतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात. गुप्तकाळात हा धर्म ग्रीस, अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता. परंतु, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामुळे त्याचे उच्चाटन झाले. बौद्ध हा नास्तिकांचा धर्म आहे. कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते. त्यामुळे सर्व कर्मातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष मिळविणे अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. कर्मातून मुक्त होण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार आर्य सत्य समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अष्टांग मार्गाचा अभ्यास केला पाहिजे. त्या द्वारेच मोक्ष मिळू शकेल असे हा धर्म सांगतो.

भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या या धर्मात हिनयान व महायान हे दोन संप्रदाय आहेत. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध जयंती असते. बौद्ध धर्मियांची प्रमुख चार तीर्थ स्थळे आहेत. लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर. बौद्ध धर्मग्रंथाला त्रिपिटक असे म्हटले जाते.

भगवान बुद्धाला गौतम बुद्ध, सिद्धार्थ, तथातगत व बोधिसत्व या नावानेही ओळखले जाते. बुद्धाचे वडिल कलिलवस्तुचे राजा शुद्धोधन हे होते. त्यांच्या आईचे नाव महामाया देवी असे होते. बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा आणि मुलाचे नाव राहूल होते.

बुद्धाचा जन्म वैशाखातील पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व ५६३ मध्ये झाला. याच दिवशी इसवी सन ५२८ ला बोधगया येथे त्यांना सत्याची प्राप्ती झाली. याच दिवशी इसवी सन ४८३ ला ८० व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे निर्वाण झाले.

बुद्धाला ज्या दिवशी सत्याची प्राप्ती झाली, त्याच दिवशी ते काशीजवळील सारनाथ येथे गेले. तेथे त्यांनी पहिल्यांदा उपदेश केला. त्यात लोकांना मध्यम मार्गाचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी दिला. दुःख, त्याची कारणे आणि त्याचे निवारण करण्यासाठी अष्टांगिक मार्ग अवलंबिण्यास त्यांनी सांगितले. अंहिसेचा पुरस्कार केला. यज्ञ, कर्मकांड, पशुबळी यांच्याविरोधात बोलले.

बौद्ध संप्रदाय-
बुद्धाच्या वेळी कोणताच संप्रदाय वा पंथ नव्हता. परंतु त्यानंतर मात्र मतभेद होऊन हिनयान व महायान हे पंथ तयार झाले. महायान म्हणजे मोठी नौका वा गाडी तर हिनयान म्हणजे छोटी गाडी वा नौका. महायान संप्रदायांतर्गतच वज्रयान नावाचीही एक उपशाखा होती. झेन, ताओ, शिंतो हेही बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जातात.

बुद्धाचे गुरू व शिष्य-
बुद्धाचे प्रमुख गुरू हे होते. – गुरु विश्वामित्र, अलारा, कलम, उद्दाका रामापुत्त आदी. बुद्धआचे शिष्य होते आनंद, अनिरुद्ध, महाकश्यप, राणी खेमा (महिला), महाप्रजापति (महिला), भद्रिका, भृगु, किम्बाल, देवदत्त, उपाली आदी. प्रमुख प्रचारक- अंगुलिमाल, मिलिंद (ग्रीस सम्राट), सम्राट अशोक, ह्वेन त्सांग, फा श्येन, ई जिंग, हे चो आदी.

बौद्ध धर्मग्रंथ-
बौद्ध धर्माची मूळ तत्वे ही आहेत- चार आर्य सत्ये, अष्टांगिक मार्ग, निर्वाण. बुद्धाने आपली शिकवण पाली भाषेत दिली. ती त्रिपिटीकामध्ये संकलित केली आहे. त्रिपिटक तीन भागात आहे. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या पिटकांमध्येही अनेक उपग्रंथ आहेत. सुत्तपिटकमध्ये धम्मपदे आहेत. धम्मपदे लोकप्रिय आहेत.

बौद्ध तीर्थ-
लुंबिनी, बोधगया, सारनाथ व कुशीनगर ही चार प्रमुख बौद्ध तीर्थस्थळे आहेत. या ठिकाणी जगभरातील बौद्ध अनुयायी येत असतात. लुंबिनी नेपाळमध्ये आहे. बोधगया भारतात बिहारमध्ये तर सारनाथ उत्तर प्रदेशात काशीजवळ आहे. कुशीनगरही उत्तर प्रदेशात गोरखपूरजवळ आहे
 
            🙏 नमो बुध्दाय जय भीम जय भारत🙏

                                                  स्रोत-इंटरनेट

विडिओ ला मिळालेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया.

  ✏️ प्रा.संजय घरडे सर (प्राध्यापक तंत्रनिकेतन वाशिम)       
                   धन्यवाद नितीन. अत्यंत सुरेख आणि ज्ञानवर्धक व्हिडियो बनवलेला आहे.
वैशाख पौर्णिमेचे महत्व (जन्म, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण), बौद्ध धम्माचा जगात प्रसार, बौद्ध धम्माचे अनावश्यक असे संप्रदाय आपण या द्वारे आमच्या समोर मांडले आणि आमच्या ज्ञानात भर पाडली. त्याबद्दल आपले आभार आणि अभिनंदन.

प्रत्येकाने सदर व्हिडियी. अवश्य बघावा.
नमो बुद्धाय. जयभिम.
🙏🙏🙏👌👌🎍🎍👍

✏️जुही घरडे
सुन्दर आहे! जय भीम नमो बुद्धाय


✏️प्रगती चवरे:
    👌👌👌khup sundar,
Jay Bhim,Namo Buddhay🙏🙏🙏

✏️Dr. Sushant Chimankar:
      रोडगे सर जयभीम नमोबुद्धाय
🙏🏻
अत्यन्त सुरेख आणि मार्मिक व्हिडीओ किल्प तयार करून आपण बुद्ध पौर्णिमेचा इतिहास उलगडवून सांगितला.....
आपणा सर्वाना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
🌻🌻🌻🌻

✏️प्रतिमा सरादे:
सुंदर व्हिडीओ आहे जयभीम🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽


✏️आरती खोब्रागडे:
🙏🙏

✏️डॉ.विनायक रोडगे
           Utkrushta utbhodan 👍🏻






Friday, 1 May 2020

१ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन विशेष


कामगारनेते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर@
आज १ मे कामगार दिन! व महाराष्ट्र दिनाच्या मंगलकामना!!.

                     किती भारतीयांना माहित आहे जिथे हा देश जातीवादाने पूर्ण पोखरून निघाला असताना, जिथे माणसाची जात व वर्ण पाहून किंमत ठरत असे, अश्या या भारतात शेतकरी- मजूर - कष्टकरी- रोजंदार याचे जगणे किती हलाखीचे- दारिद्रयाचे असतील याची कल्पना सुद्धा केली तरी अंगावर शहारे येतात, जिथे बहुसंख्य(ओबीसी) यांनाही शुद्र म्हणून अपमानित केले जात असेल तिथे गरिब - लाचार मजुराची काय अवस्था असेल. सुविधा- सवलती हे नावच कधी ऐकले नसावे मागील सात पिढ्यांनी..मजुराचे जीवन म्हणजे नरक यातना... 
     कष्टकरी -रोजंदारांचे जीवन म्हणजे रोजचा काटेरी वनवास.अश्या भीषण परिस्थितून बाहेर काढावयास कोणी मायका लाल 33 कोटीतून अवतरला नाही, जिथे गीताच म्हणते .....
"कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l "
अर्थात , कामगारानो दिवस रात्र फक्त घाम गाळा,मेहनत करा, सवर्णांची सेवा चाकरी करा, त्यांची धुनीधुआ, शेतात राबा, त्यांचा मैला साफ करा, जीव तोडून मजुरी करा मात्र मजुरी मांगू नका. कारण मैला साफ करणे हेच तुमचे कर्म, तम्ही नीच - कुल्षित आहात म्हणून फळाची अपेक्षा करू नका..
   देव आज्ञा समजून अढीच हजार वर्षे से सर्व मुकाट्याने सहन करीत राहिले.गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारा गुलामी सहन करेल का? 
नाही कधीच नाही!!
बाबासाहेब तुम्हाला ….
माझ्या तुमच्या पूर्वजानसारखे लाचार वाटले का?
   ते करारी तडफदार मिलिटरी सैनिक सुबेदार सकपाळांचे सुपुत्र होते.माझ्या शेतकरी- मजूर - कष्टकरी यांनी वरील होणारा अन्याय का सहन करावा? म्हणून संधीच्या शोधत असताना, ब्रिटीश राजवटीत मजूर मंत्री पदावर काम करावयाची संधी मिळाली आणि मजुरांचे दिवस पालटले... 
बुलंद आकाशात सुर्य... 
आणि धरणीवरचा महासूर्य बाबासाहेब.... 
   शेतकरी- मजूर - कष्टकरीयांच्या अंधार जीवनात कायमचा महाप्रकाश टाकून गेला..
   अरे यां कारखाण्यातील, शेतावरील, उद्योग-व्यवसायातील कर्मचारी- मजुरा तुला माहित आहे का?
   तुला कोणी दिल्या सुविधा- सवलती...
    होय!!!महासूर्य बाबासाहेब आंबेडकरांनी...

1 आठ वाजता जांची वेळ (फॅक्टरी कामकाजाचे तास 8 तास शुल्क)

२. महिला प्रसूती रजा (खाणी प्रसूतिपूर्व कायदा)

3.महिला कामगार वेलफेयर फंड (महिला कामगार वेलफेयर फंड)

4.महिला व बालकामगार संरक्षण कायदा (महिला व बाल कामगार कामगार संरक्षण कायदा)

5.खाणकामगार सुविधा (कोळसा खाणींमध्ये महिलांच्या भूगर्भातील कामांवरील बंदीची जीर्णोद्धार)

6. भारतीय फॅक्टरी कायदा (भारतीय फॅक्टरी कायदा)

7. महिला कामगारांसाठी प्रसूती लाभ,

Coal. कोलमाइन्समधील भूमिगत कामावर महिलांच्या रोजगारावरील बंदीचे पुनर्वसन,

National. राष्ट्रीय रोजगार एजन्सी (रोजगार विनिमय):

9. रोजगार एजन्सी तयार केली गेली.

१०. कर्मचारी राज्य विमा (ईएसआय):

११. भारताचे जल धोरण व विद्युत शक्ती नियोजनः
१२. कामगारांना महागाई भत्ता (डीए)

13. पीस कामगारांना लाभ द्या.

14. एम्प्लॉईजसाठी वेतनमानाचे पुनरीक्षण.

15. कोळसा आणि मीका खाणी भविष्य निर्वाह निधी:

१.. कामगार कल्याण निधी:

१.. युद्धोत्तर आर्थिक नियोजनः

18. दामोदर व्हॅली प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प, सोन नदी खोle्याचे प्रकल्प निर्माते.

१.. भारतीय कामगार संघटना (दुरुस्ती) विधेयकः

20. भारतीय सांख्यिकी कायदा:

२१. आरोग्य विमा योजना

22. भविष्य निर्वाह निधी कायदा.

23. कारखाना दुरुस्ती कायदा.

24. कामगार विवाद कायदा.

25. किमान वेतन

आज फेक्टरीतला कामगार, व कार्पोरेट मधील अधिकारी सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर याचे जीवनसंघर्ष विसरता कामा नये..आज कामगार दिनी या महान क्रांतीसुर्याला पुन्हा एकदा मानाचा जयभीम करूया....

जयभीम ! 
जय शिवराय !! 
जय भारत !!!

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर

आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज आपण सर्व ५५वा 'महाराष्ट्रदिन' साजरा करत आहोत.

" मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे " या मागणीतून ' संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय.
सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.

डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे 'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला' हे निर्भेळ यश मिळाले.
कॉ. डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे… आणि अश्या बऱ्याच  जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमुल्य योगदान दिले.

    पण आज संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगितला जात असताना केवळ डांगे, अत्रे आणि जोशी यांच्याच नावाचा गवगवा केला जातो. त्यांचे योगदान कुणीही नाकारत नाही, पण त्यांच्यासोबतच काम करणाऱ्या '
'शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे)'च्या दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे…. इत्यादी मंडळींचा उल्लेख साफ टाळला जातो. आणि त्यापेक्षाही वाईट याचे वाटते कि जो हा 'संयुक्त महाराष्ट्राचा लढा' ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात लढला गेला त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कुणीही करत नाही याचा !!

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरु असताना प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे यांना या लढ्याबद्दल डॉ. बाबासाहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हा लढा यशस्वी झाला त्या डॉ. आंबेडकरांचे स्मरण केल्याशिवाय मी तरी ' महाराष्ट्र दिन ' साजरा करत नाही.
बाबासाहेबांच्या दादर, मुंबई येथील 'राजगृह' या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची दिशा कशी असावी याचे मार्गदर्शन स्वतः बाबासाहेबांनी प्र. के. अत्रे, डांगे, प्रबोधनकार या मंडळींना केलेले आहे. या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी 'मराठा' या वृत्तपत्रातून प्र. के. अत्रे जसे रान उठवत होते, त्याप्रमाणेच डॉ. आंबेडकर आपल्या 'जनता' मधून महाराष्ट्रीयन जनतेची बाजू मांडत होते.
याच बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार पुढे दादासाहेब गायकवाड यांनी शोषित-वंचित-कष्टकरी मराठी जनांचा एक अभूतपूर्व मोर्चा मुंबईत काढला होता.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन
मुंबईसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी महाराष्ट्राला न देण्यासाठी मुंबईतील भांडवलदार, ज्यात जास्त अमराठी होते त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात केली. आणि त्याचवेळेस " मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे " या मागणीनेही जोर पकडला. त्याचवेळेस बाबासाहेबांनी ७ जाने. १९५६ ला एक पत्रक प्रसिद्ध करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रस्तावास विरोध केला.

** मुंबईवर हक्क कुणाचा ?? **

मुंबई हि राज्याची अस्मिता आहे हे सर्वजण मान्य करत होते, पण ती का व कशी ? याबद्दल मात्र कुणीच काही बोलत नव्हते. त्यावर बाबासाहेब म्हणतात--

" मुंबईचे खरे वारसदार आहेत ते कोळी ! जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क  का पोहचू शकत नाही ? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ १५ % , पण ५० % हून अधिक असलेल्या   महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारता ? मुळचे कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई, पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्याने घेतली व कब्जा केला. राणी विधवा होती, बिचारी काही करू शकत नव्हती. त्यानंतर ब्रिटीश राजा-दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा १० पौंडापेक्षा जास्त नव्हता. त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती. "

( संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड-१०, पृष्ठ क्र. ८५
  संपादक :- प्रदीप गायकवाड )

यावरून स्पष्ट दिसून येते कि ' संयुक्त महाराष्ट्रच्या लढया'त बाबासाहेबांचे अमुल्य योगदान राहिले आहे. म्हणून यापुढे महाराष्ट्राचा इतिहास सांगताना बाबासाहेबांच्या या कार्याचीही इतरांना ओळख करून द्यावी.
 याचा सर्वांनी जास्तीत जास्त प्रसार करावा व बाबासाहेबांचे कार्य फक्त शोषित-वंचित समाजापुरते मर्यादित न करता बाबासाहेबांचे इतर महत्वाचे कार्यसुद्धा जगासमोर आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत.

तसेच तुम्हा सर्व भारतीयांना १ मे या जागतिक कामगार दिनाच्या आणि 'महाराष्ट्र दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा !!