31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन
31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वतीने ३१ मे १९८७ साली करण्यात आली. ‘तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे रोग’ या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख...
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
तंबाखू वनस्पती :-
तंबाखूला निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांपासून बनविण्यात येते. तंबाखूचे पीक जगभरात उपलब्ध असून त्याला उत्तम मागणी आहे. निकोटीन हा तंबाखूमधील एक प्रमुख घटक असतो.
तंबाखूचा इतिहास :-
अमेरिकेमध्ये इसवीसनपूर्व ६००० मध्ये तंबाखूची शेती केल्याचे सर्वात जुने पुरावे सापडतात. तेथील आदिवासींनी धार्मिक आणि औषधी कारणासाठी तंबाखूचा वापर केला होता.भारतात तंबाखूचे पीक इसवीसन १६००च्या सुमारास पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आणले. भारतात त्या आधीही तंबाखूच्या काही स्थानिक जाती होत्या. परकीय व्यापाऱ्यांसाठी भारत हे तंबाखूचे एक प्रमुख उत्पादन केंद्र बनले. ब्रिटीश राजवटीत तंबाखू हे एक प्रमुख नगदी पीक होते.
तंबाखूचे प्राचीन पुरावे :-
भारतातील प्राचीन साहित्यांमध्ये तंबाखूचे ‘तमाखू’ असे वर्णन करण्यात आले आहे. संस्कृत आणि इतर काही प्रादेशिक भाषेतील साहित्यांमध्ये तंबाखूचे सतराव्या शतकापूर्वीचेही दाखले मिळतात. काही इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकाच्या सुरवातीस तंबाखूची वनस्पती अमेरिकेतुन भारतात स्थलांतरीत झाली. भारतामध्ये गांज्याचा वापर इसवीसनपूर्व २००० पासून असून, सर्वप्रथम त्याचा उल्लेख अथर्ववेदामध्ये करण्यात आला आहे, प्राचीन काळी तंबाखूचा उपयोग आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्हीसाठी केला गेला. तसेच, पाहुण्यांचे स्वागत करतानाही तंबाखू भेट म्हणून दिली जात असे.
तंबाखूचे उत्पादन करणारे देश :-
तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होते. यानंतर ब्राझील आणि भारताचा क्रमांक येतो. भारतात आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिमबंगाल या राज्यांमध्ये तंबाखूचे पीक घेतले जाते. तमिळनाडु, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, म्हैसूर आणि पश्चिम बंगालमध्ये तंबाखू संशोधन केंद्रे आहेत.
तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम :-
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम :-
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
मोहीम :-
एकीकडे भारतासह जगभरातील देशांमध्ये त्याविरूद्ध मोहीम सुरू आहेत, तर दुसरीकडे कंपन्या तरूण आणि महिलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तंबाखू कंपन्या सिगारेटपेक्षा कमी हानिकारक म्हणून च्युइंग, स्निफिंग आणि हुकसाठी वापरली जाणारी उत्पादने विकत आहेत.
तंबाखूवर कर लावून ते तंबाखूविरोधी मोहिमेवर जगातील देशांपेक्षा पाच पटीने अधिक कमावतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की कोट्यवधी लोकांची उदरनिर्वाह त्यातजोडलेलीआहे.
झाफराणी जरदा आणि पॅन मसाला असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक चैतन्य अग्रवाल म्हणतात, "सरकार त्यावर भारी कर लादते, परंतु हे कोट्यवधी लोकांच्या उदरनिर्वाहाचे काम करणे देखील महत्त्वाचे आहे."
दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, बिडी लावण्यास बंदी आहे, पण यासाठी कोणालाही शिक्षा झालेली नाही.
अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ ब्लूमबर्ग आणि बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या मदतीने घेतलेल्या अभ्यासानुसार अशी शिफारस केली गेली आहे की भारतात तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एक्साईज टॅक्स वाढवून तंबाखूजन्य पदार्थांच्या किंमती वाढविणे.
२०१० पर्यंत दरवर्षी तंबाखूमुळे होणा deaths्या मृत्यूची संख्या १० लाखांपर्यंत असू शकते असे संस्थेचे म्हणणे आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे बहुतेक मेलेले लोक गरीब व अशिक्षित असतील.
गुटखा :
गुटखा म्हणजे तंबाखू, चुना,सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला, इ. चे मिश्रण असते. अनेक नावांनी गुटखा विकला जातो. पान मसाला, गुटखा, सुपारी, आदी पदार्थ चघळणाच्या सवयीमुळे हा आजार दिसून येतो. या आजारात तोंडातल्या मऊ त्वचेखालील भाग निबर होत जातो. यामुळे तोंडाची हालचाल आखडत जाते. तोंडात पांढरट चट्टे दिसू लागतात. हा चट्टा बोटाने चाचपता येतो. जीभेवरही पांढरट डाग येतात. जीभ 'संगमरवरी' पांढरट गुळगुळीत दिसते.हा आजार हळूहळू काही महिन्यांत वाढतो. दिवसेंदिवस तोंड उघडायला कठीण होऊ लागते. आजार जास्त वाढेपर्यंत त्या व्यक्तीला पुरेसे कळून येत नाही. आणखी एक लक्षण म्हणजे मसाला, तिखट तोंडाला अजिबात लागू देत नाही, खूप झोंबते. या आजारातून पुढे कॅन्सर उद्भवू शकतो.गुटखा विकण्याला महाराष्ट्रात बंदी आहे. काही राजकीय पक्षांनी याबद्दल मोहीम सुरु केली होती. तरीही बेकायदेशीर रित्या गुटखा निरनिराळया नावाने विकला जात आहे. लोकशिक्षण हा यासाठी जास्त चांगला व टिकाऊ उपाय आहे. संपूर्ण भारतातही आता गुटख्याला बंदी लागू झाली आहे. उपचार गुटखा रोगावरचा उपायही बरेच दिवस करावा लागतो. (अ) बीटा- कॅरोटीनची रोज एक गोळी याप्रमाणे सहा महिने द्यावी. (ब) काही दंतवैद्य मानवी वारेचे सत्त्व इंजेक्शनच्या स्वरूपात डागाखाली टोचतात. (क) या उपायांबरोबरच आखडलेले तोंड सैल करावे लागते. यासाठी एक गुळगुळीत लाकडी पाचरीसारखी फळी दिवसातून 3-4 वेळा तोंडात 15-20 मिनिटे ठेवावी. रोज थोडी थोडी जास्त पाचर घालावी. यामुळे हळूहळू तोंड सैल होते.
तंबाखू सेवन कसे सोडू शकता? :-
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे व्यसन सोडता येऊ शकते. धूम्रपान करणा-या लोकांपासून दूर राहा. दारूचे व्यसन टाळा. त्यामुळे धूम्रपान करण्याची इच्छा होते. धूम्रपानाची सवय बदला आणि त्या जागी इतर गोष्टींची सवय करून घ्या. शारीरिक व्यायाम, योगा यांसारख्या उपक्रमांत स्वत:ला गुंतवा.
आपली जबाबदारी :-
व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा
स्रोत - इंटरनेट
संदर्भ साहित्य
Watching video👇

No comments:
Post a Comment