Monday, 20 April 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलनीती चे उद्गगाते


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलनीती चे उद्गगाते 




आजही पाणी विषयावरील गुंतागुंत कायम आहे. नद्यांच्या पाणी वापरावे वाटपाचे विषय वारंवार उद्भवू शकतात. त्यासाठी आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय करार करावे लागतात .
ते राज्य सरकार करू शकणार नाहीत त्यात केंद्र सरकारला लक्ष घालून प्रश्न सोडवावे लागतील. यदाकदाचित राज्याराज्यांमध्ये आणि  देशांमध्ये पाण्यावरून संघर्ष झाले तर ते सोडविण्याचे काम केंद्र सरकारलाच करावे लागेल. 

     राज्य सरकार हे काम करू शकणार नाही म्हणून पाणी हा विषय केंद्रीय सरकारच्या अखत्यारीत असणे गरजेचे आहे. असा अत्यंत दूरदृष्टीचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला होता. देशाचा इतका दूरगामी व सर्वंकष विचार फार कमी लोकांनी केला .

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनातून या देशातील केवळ दलितांच्या प्रश्नांची सोडवणूक केली असे नाही तर देशाच्या सर्वांगीण विकासात पायाभूत गोष्टीवर भर देऊन दीर्घकालीन विकास योजना पूर्ण करून सामाजिक समतोल राखण्याचे काम त्यांनी केले आहे.
 पाण्याचा गुणधर्म समपातळीत राहणे हा डॉक्टर आंबेडकर यांनी पाण्याच्या गुणधर्मांचा स्वतःच्या कार्यक्षमतेने वापर करून समस्त समाज व्यवस्था विकास योजनांच्या माध्यमातून समपातळीत ठेवण्याची ऐतिहासिक कार्य केले.


 या विषयावर तयार करण्यात आलेला  विडिओ

जलनीती, जलव्यवस्थापन व पाण्याचे नियोजन कसे करावे यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.
 खाली विडिओ ची link दिली आहे.
  
                          👇
   https://youtu.be/OYbj3N0-_to







No comments:

Post a Comment