Tuesday, 28 July 2020

28 जुलै जागतिक कावीळ (यकृत विकार) दिवस


 28 July World HEPATITIS Day
जागतिक कावीळ दिन








                  कावीळ हा विषाणूंमुळे किंवा काही आजाराच्या यकृतावरील दुष्परिणामांमुळे होणारा रोग आहे. याला इंग्रजीमध्ये 'हिपाटाईटीस' असे म्हणतात. हा मुख्यत्वेकरून यकृताचा रोग आहे. ह्या रोगाचे कारणीभूत असलेल्या विषाणूनुसार नाव दिले जाते. 
              
                 कावीळ ही एक स्थिति आहे. यामध्ये त्वचा आणि डोळ्यामधील बाह्य पांढरा भाग रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढल्याने पिवळा दिसायला लागतो. हे यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. काविळीस ग्रीक भाषेमध्ये इक्टेरस म्हणजे पिवळा या अर्थाचा शब्द आहे. संस्कृतमध्ये काविळीस कामला असे म्हणतात.
     
             हेपेटायटिस म्हणजेच कावीळ हा आजार आजही भारतात चिंतेचा विषय आहे. सर्वात जास्त मृत्यू होण्यामध्ये कावीळ या आजाराचा तिसरा क्रमांक लागतो. २८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून पाळला जातो. पण, आजही कावीळबाबत लोकांमध्ये तितकीशी जनजागृती यला मिळत नाही. खरंतर, दुषित पाण्यामुळे, उघड्या वरच्या खाल्लेल्या अन्नपदार्थांमुळे कावीळ होते. पण, आजही लोकांचा या आजारासाठी गावठी औषधं म्हणजेच झाडपाल्यांच्या औषधांकडे जास्त कल असल्याचं समोर आलं आहे. भारतात ५० टक्के नागरिक आजही कावीळसाठी झाडपाल्यांची औषधं वापरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

✏️ वर्णन :-
                यकृताचे प्रमुख कार्य कोलेस्टेरॉल सारख्या टाकाऊ पदार्थापासून पित्त बनविणे. पित्त लहान आतड्यात पित्तनलिकेमधून बाहेर सोडले जाते. एका अर्थाने यकृत हा शरीरातील रसायनांचा कारखाना आहे. शरीरात आलेली सर्व आणि या पासून विघटन झालीली सर्व रसायने, औषधे यकृतामधून विघटन होऊन येतात. पचन झालेले अन्नघटक, विषारी द्रव्ये, औषधे, सर्वासाठी हा एक थांबा आहे. रक्तामधील रसायनांवर यकृत प्रक्रिया करते. बाह्य रसायनावर प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले अवशिष्ट भाग पित्तामधून शरीराबाहेर येतात. यामधील एक घटक बिलिरुबिन पिवळ्या रंगाचे आहे. हीमोग्लोबिनच्या विघटनानंतर बिलिरुबिन तयार होते. हीमोग्लोबिन मधील प्रथिन विघटनाचे हे उत्पादन. बिलिरुबिन शरीराबाहेर पडले नाही तर ते साठून राहते आणि इतर उतीना पिवळा रंग येतो. बिलिरुबिनचे रक्तातील सामान्य प्रमाण 0.2 मिग्रॅ / शंभर मिलि पासून 1.2 मिग्रॅ / शंभर मिलि असते. हे प्रमाण वाढून 3 मिग्रॅ / 100 मिलि झाले म्हणजे त्वचा आणि डोळ्यामधील बाह्य पांढरा भाग पिवळा दिसायला लागतो. पित्त यकृतामध्ये तयार होते. एकदा यकृतपेशीमध्ये तयार झाल्यानंतर ते पित्त वाहिन्यामधून एकत्र येते. पित्तवाहिन्या पित्तनलिकेमध्ये उघडतात. पित्तनलिकेची एक शाखा काहीं पित्त पित्ताशयामध्ये जमा करते. पित्ताशयामध्ये साठलेल्या पित्तामधील पाणी पित्ताशयाच्या भिंती शोषून घेतात. पित्ताची संहति त्यामुळे वाढते. पित्ताशयातील पित्त बाहेर आणणारी नलिका आणि यकृतामधील काहीं पित्त एका एकत्रित नलिकेद्वारे लहान आतड्यामध्ये उघडतात. एरवी पित्त थोड्या थोड्या प्रमाणात आतड्यामध्ये येतच असते. जेंव्हा अन्न जठरामध्ये येते त्या संवेदामुळे पित्ताशयातील पित्त मोठ्या प्रमाणात आतड्यामध्ये येते. पित्तनलिका आतड्यामध्ये उघडण्याआधी स्वादुपिंडामधील स्त्राव आणणारी स्वादुरस नलिका पित्तनलिकेबरोबर मिळते. पित्त आणि स्वादुरस दोन्ही एकत्रपणे आतड्यात उघडतात. नलिकेस असलेल्या ॲळम्पुला ऑफ व्हेटर च्या झडपेने नलिकेमधील स्त्राव नियंत्रित होतो. लहान आतड्यात आल्यानंतर पित्त आणि स्वादुपिंड रस दोन्ही मिळून अन्नपचनास मदत करतात.


✏️कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज:-

 जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगभरात प्रत्येक ३० ते ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू हा यकृताच्या आजाराने होतो.
पण, तरीही आपल्या शरीरामधील पाचशेहुन अधिक कार्य करणाऱ्या आणि अनेक रोगांना दूर ठेवणाऱ्या यकृताच्या आजाराबद्दल अजूनही जागरूकता आलेली नाही. कावीळबाबत भारतामध्ये बरेच गैरसमज आहेत. जसे की, माळ बांधणे आणि कावीळ उतरणे या गैरसमजुतींचा या रोगाशी काहीही संबंध नाही. या अंधश्रद्धेतूनही अनेकदा लोकांचा जीव जातो.
पावसाळा सुरू झाल्यावर दुषित पाण्याचे प्रमाण वाढते आणि हे पाणी शरीरात गेल्यावर कावीळचे रुग्ण वाढू लागतात. कावीळसाठी झाडपाल्याच्या औषधांकडे लोकांचा झुकता कल आहे. हेपटायटीस (कावीळ ) म्हणजे लिव्हरला आलेली सूज. तसेच लिव्हरला झालेला संसर्ग. पण, हे असे घरगुती किंवा झाडपाल्यांची औषधं आणि उपचार लोकांच्या जीवावर बेतू शकतात.
- डॉ. इमरान शेख, क्हार्ट हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट

✏️काविळचे प्रकार आणि लक्षणे: -

काविळीची अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने त्याचे तीन गट पडतात. पित्त कोठे आहे यकृत पूर्व , यकृतामध्ये किंवा यकृतपश्चात. बिलिरुबिन तयार झाल्यानंतर ते पाण्यात अविद्राव्य असते. यकृतामुळे बिलिरुबिन पाण्यात विद्राव्य होते. याला अविद्राव्य आणि विद्राव्य बिलिरुबिन असे म्हणतात. रक्ततपासणीमधून विद्राव्य आणि अविद्राव्य बिलिरुबिनचे प्रमाण कळते.
हेपटायटीस ए, हेपटायटीस बी, हेपटायटीस सी, हेपटायटीस ई हे त्याचे सर्वसाधारण प्रकार आहेत. हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस - हे व्हायरस दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. ते यकृतावर हल्ला करतात आणि आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. यामध्ये रुग्णाला थकवा आणि ताप येतो. डोळे पिवळे होतात आणि लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. काविळचे निदान लवकरात लवकर होणं आवश्यक असतं.
काविळीची लक्षणे आणि त्यामधील गुंतागुंत
पित्तामधील काहीं रसायने त्वचेमध्ये पोहोचल्यानंतर त्वचेस खाज सुटते. नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या मेंदूमध्ये पित्त साठल्यास मेंदूवर कायमचा परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ झालेल्या काविळीमुळे पित्ताचे खडे बनतात. डोळ्याचा आणि त्वचेचा पिवळेपणा ही सामान्य बाब आहे. गुंतागुंतीचे परिणाम सोडले तर कावीळ हा फार गंभीर आजार नाही. ज्या कारणाने कावीळ झाली त्यावरून काविळीमधून इतर लक्षणे निर्माण होतात.



✏️ निदान:-

           तपासण्या- बहुतेक रुग्णामध्ये कावीळ झाल्याचे डोळ्याच्या आणि त्वचेच्या रंगावरून समजते. डॉकटर रुग्णास उताणे झोपवून यकृत हाताने चाचपून पाहतो. यकृताचा लवचिकपणा आणि प्लीहा मोठी झाली असेल तर पोटदुखीचे निदान करता येते. यकृतावर दाव दिल्यास काविळीमध्ये पोट दुखते. दुखणा-या पोटावरून आणि चाचपून यकृतजन्य किंवा अवरोधी काविळीचे निदान होते.

✏️ प्रयोशाळेतील चाचण्या:-

रक्तामधील दोष पाहण्यासाठी रक्त किंवा अस्थिमज्जा तपासणी करावी लागते. सुईने अस्थिमज्जा बाहेर घेऊन कधी कधी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास अधिक माहिती समजते. पण बहुधा रक्ततपासणीमधून काविळीचे निदान होते. अल्ट्रासाउंड चाचणीमधून प्लीहेमधील बिघाड समजतो. न्यूक्लियर स्कॅन हा आणखी एक पर्याय आहे. यकृताच्या पेशी एका सुईने बाहेर काढून यकृतपेशीमध्ये काहीं बदल झाला असल्यास पाहता येतो. ही परीक्षा प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली करण्यात येते. अर्भकामध्ये काविळीचे निदान : अर्भकामध्ये कावीळ असल्यास खालील निष्कर्ष काढण्यात येतात. • बालक अपु-या दिवसाचे असते. • अशियायी किंवा मूळ अमेरिकन रेड इंडियन वंशाचे • बालक जन्मताना त्यास इजा झाली असल्यास • पहिल्या दोन तीन दिवसात झालेली वजनातील घट • समुद्रसपाटीपासून अधिक उंचावर जन्मलेली मुले • मातेस मधुमेह • प्रसूति कळाशिवाय होऊन प्रसवास बाह्य मदत करावी लागली 2003 मध्ये अंतर्गत तपासणी शिवाय रुग्णाच्या रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण शोधून काढण्यासाठी संशोधन करण्यात आले. त्यामुळे बाळाच्या काविळीचे फक्त पाहून निदान करणे थांबले. वैद्यकीय निदानासाठी त्वचेच्या रंगाचे मोजमाप करण्याची पद्धत सर्वत्र चालू झाली. एकदा घरी नेलेल्या बाळास वैद्यकीय स्वयंसेवकांनी चोवीस तासानंतर जाण्याची पद्धत चालू झाली. 

               पित्त वहन आणि साठवण्याच्या संस्थेमधील अडथळे किंवा बिघाड शरीरांतर्गत दृश्य पाहण्याच्या चाचणीमधून लक्षात येतात. क्ष किरण विरोधी द्रव पोटात घेऊन फोटोग्राफी केल्यास पित्तनलिकेमधील आणि पित्ताशयातील अडथळे समजतात. क्ष किरण विरोधी द्रव्य शरीतात घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. सूक्ष्म सुईने थेट पित्तनलिकेमध्ये तो टोचता येतो. गॅस्ट्रोस्कोपने जठरामधून पुढे सरकवलेले उपकरण क्ष किरण विरोधी द्रव्य ॲेम्प्युला ऑफ व्हेटर मध्ये सोडता येतो. सीटी आणि एमआरआय चाचण्यानी यकृताचा कर्करोग आणि पित्ताशयातील खडे शोधता येतात.

✏️ जगातील २ अब्ज लोक कावीळने ग्रस्त:-

                           जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, आतापर्यंत जगातील २ अब्ज लोक काविळीने बाधित झाले आहेत. जगातली प्रत्येक पंधरावी व्यक्ती या विषाणूने बाधित होत असते. जगभरात दरवर्षी ७ लाख लोक या रोगाच्या गंभीर दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. हेपेटायटिसच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत भारत देश पहिल्या १० मध्ये येत असून ४ ते ८ टक्के लोक दरवर्षी या विषाणूने बाधित होतात. मुंबईत 'ए' आणि 'ई' प्रकारच्या काविळीच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या काविळीच्या व्हायरसचा दूषित पाण्यातून प्रसार होतो, असे गेल्या १० वर्षाच्या निरीक्षणांमधून सिद्ध झाले आहे.

✏️ यकृत पश्चात कावीळ:-
                                 अवरोधी कावीळीवरील उपचार शस्त्रक्रियेने करावे लागतात. मूळ पित्तमार्ग मोकळा करता आला नाही तर नवा पर्यायी मार्ग करावा लागतो. अशा प्रकारातील एक सर्वमान्य प्रकार म्हणजे यकृतावर एक लहान आतड्याचा उघडा भाग शिवून टाकणे. यकृताच्या त्या भागातील सूक्ष्म पित्तनलिका आतड्यामध्ये पित्त ओततात. अवरोध झालेल्या भागतील पित्ताचा दाब त्यामुळे कमी होतो. पित्त प्रवाह वाढला म्हणजे पित्तनलिकेचा आकार वाढतो. अशा पित्तनलिकेमधून पित्त लहान आतड्यामध्ये येत राहते.

✏️ प्रतिबंध:-

एरिथ्रोब्लास्टोसिस फेटॅलिस हा आजार असल्यास मातेचा रक्तगट आर एच निगेटिव्ह असतो. RhoGAM गॅमा ग्लोब्युलिन इंजेक्शन दिल्यास अर्भकाच्या विरुद्ध प्रतिद्रव्य निर्मिती होत नाही. G6PD ग्लूकोज सिक्स फॉस्पेट डीहायड्रोजिनेझ मुळे होणारे विघटन टाळता येते. आधीच उपचार केल्यास पेशी विघटन त्वरित थांबवता येते. लक्षणे कमी झाल्यानंतर औषधे त्वरित थांबवली म्हणजे तर होत नाही.

साभार :- इंटरनेट व संदर्भ साहित्य


No comments:

Post a Comment